जामखेड शहरातील मोकाटजणावरांवर नगरपरिषदेने सुरू केली कारवाई..

- Advertisement -spot_img

जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे मोकाट सोडु नये! आन्यथा कारवाई होणार :मुख्याधिकारी अजय साळवे..

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड शहरात गेली आनेक वर्षांपासून रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मोकाट जणावरे फिरत आहेत शहरातीच जणावरांचे मालक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या जणवरांचा वाहतुकीस आडथळा निर्माण होतो तसेच भाजीविक्रेत्यांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना या जनावरांमुळे त्रास होत आहे

याच आनुशंगाने जामखेड नगरपरिषदेने आज सकाळपासूनच कारवाईचा बडगा उगारला आसुन जवळपास पंधरा ते वीस जनावरांना ताब्यात घेतले त्या पैकी चार जणावरांचे मालक आढळून आले नसल्याने ती जणावरे साकत येथील गोशाळेत सोडण्यात आले तसेच सार्वजनिक रस्त्यावर बसलेली मोकाट जनावरे मुख्यत गर्दीचे ठिकाणी चौक, बाजारतळ, खर्डा रोड, बीड रोड, मार्केट यार्ड या ठिकाणी कारवाई करण्यात आले आहे.

तसेच नगरपरिषदेच्या वतीने उद्या दि. २८/७/२०२५ पासून रिक्षा फिरवून जनजागृती करून, अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे असे आव्हान नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे.नागरिकांनी आपली जनावरे मोकाट सोडु नयेत नाहीतर कडक कारवाई होईल नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले आहे

यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी ज्ञानेश्वर मिसाळ (आरोग्य व पाणीपुरवठा विभाग प्रमुख) , प्रणित सदाफुले (आरोग्य व पाणीपुरवठा विभाग लिपिक), बाळू काळे (मुकादम) व आरोग्य कर्मचारी बाळू लांडगे, कल्याण काळे, सतिश कंगने, अण्णा लोखंडे, भास्कर लोंढे, विजय जाधव ,तानाजी घायतडक, तन्वीर सय्यद, विशाल जाधव  आदी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा