श्रावणमास आरंभाच्या पुर्व संध्येला ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त नामसप्ताहास भक्तीमय वातावरणात झाला प्रारंभ.

- Advertisement -spot_img

गेली आनेक वर्षांपासून यात्रा उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे केले जाते आयोजन.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त सदगुरू श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने २२ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज दिनांक २४ जुलै रोजी भक्तिभावाने प्रारंभ झाला. यानिमित्त आयोजित श्री नागेश्वर पालखी सोहळ्याच्या विणा पूजनाचा मान जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना मिळाला.

जामखेडची नागपंचमी ही राज्यात प्रसिध्द आहे ग्रामदैवत श्री नागेश्वराच्या यात्रेनिमित्त हा पंचमीचा उत्सव साजरा होत आसतो होमहवन, नामसप्ताह, आनंद नगरी, आणी निर्तिंकाचे डाव आसे यात्रेचे स्वरूप आहे आणी या यात्रा उत्सवाचा प्रारंभ धार्मिक कार्यक्रमांनी झाला.

कार्यक्रमास जेष्ठ नेते मधुकर (आबा) राळेभात, आदर्श फाऊंडेशन अध्यक्ष आकाशशेठ बाफना,विनायक राऊत, संतोष बारगजे, आनंद राजगुरू, ह.भ.प. विक्रम महाराज बागडे, ह.भ.प. पंढरीनाथ महाराज राजगुरू, श्री नागेश्वर पालखी सोहळा समितीचे सदस्य, शहर व परिसरातील शेकडो भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सप्ताहाच्या दरम्यान हरिपाठ, कीर्तन, प्रवचने अशा धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या भक्तीमय पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा