ग्रामदैवत श्री नागेश्वराच्या यात्रेनिमित्त उद्या रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार.

- Advertisement -spot_img

प्रथम नगराध्यक्ष केसरीचे करण्यात आले आहे आयोजन..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड मध्ये प्रथमच ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त नागेश्वराच्या पावनभुमीत जामखेड नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष मा. विकास राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त “एक आदत, एक बैल” भव्य अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे

तसा जामखेडकरांना बैलगाडा शर्यत ही स्पर्धा नवखी आहे नागपंचमी निमीत्ताने जामखेड शहरात धार्मिक,सांस्कृतिक, कुस्ती मैदान, आनंदनगरी यांचे आयोजन होत आहे
परंतु धर्मवीर युवा मंचाच्या वतीने आणखी एक स्तुत्य आसा बैलगाडा शर्यतीची स्पध्रेचे आयोजन करून या ऊत्सवात भर घातली आहे

ही शर्यत उद्या दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 8.00 वा सुरू होणार आहे नागेश्वर मैदान विकास नगर शेजारी बीड रोड जामखेड येथे आयोजन करण्यात आले आहे

विजेत्या बैलजोडीसाठी प्रथम पारितोषिक 51000 हजार रू द्वितीय 31000 हजार रु.
तृतीय 21000 हजार रू देण्यात येणार आहे
तर चार ते बारा क्रमांकाच्या विजयी बैलजोडीलाही पारितोषिके देण्यात येणार आहेत

शासनाच्या नियम व आटी पाळुन ही शर्यत होणार आसल्याचे आयोजकांनी सांगितले आहे

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा