नवी दिल्ली येथे पार पडलेल्या सभारंभात केंद्रीय केंदीय राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनूसार परवडणारी घरे प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल जामखेड येथील प्रसिद्ध सौरभ (विशाल) नामदेव शिंदे यांना ‘पीएमएवाय अफोर्डेबल हाऊसिंग अवॉर्ड्स २०२५’ या पुरस्काराने गौरविण्यात आले असून या यशाबद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली येथील हॉटेल इरॉस येथे दि. ५ जून २०२५ संपन्न झालेल्या भव्य विशाल पुरस्कार वितरण समारंभात भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार खात्याचे केंदीय राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते व गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव शंकर अग्रवाल यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सौरभ शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

ज्या बेघर नागरीकांना जामखेड शहरात घर नाही तसेच घर बांधायला जागाही नाही. अश्या नागरिकांसाठी सुखसागर नगर
प्रकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनूसार परवडणारी घरे प्रकल्पांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातुन सर्व सुविधांनी युक्त अशी तब्बल २८० घरे बांधून दिली असून जामखेडसारख्या ग्रामीण भागात झालेल्या हे काम खरच गौरवास्पद आहे. महाराष्ट्रातील ज्या काही निवडक व्यक्तींना सदर पुरस्काराने सन्मानित आले आहे त्यामध्ये सौरभ शिंदे यांचा समावेश होता.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्कायलाइन एंटरप्रायझेस’चे जामखेडकरांना परवडणारी घरे देण्याचे काम उत्तमरित्या सुरू असून या घरांचे जे लाभार्थी आहेत त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

युवा उद्योजक सौरभ (विशाल) शिंदे यांच्या या यशाबद्दल उद्योगक्षेत्रातील व समाजातील विविध मान्यवरांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


