चालत आलेल्या रूढी परंपरांचा मतितार्थ समाजाने जाणुन घ्यावा..

जामखेड प्रतिनिधी
सण उत्सव आपल्या पवित्र भुमित मोठ्या उत्साहात साजरे केले जातात बारमाहिने वेगवेगळे सण आपण साजरे करत आसतो त्यातीलच प्रखर उष्ण ऋतुतील होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.

घरासमोर किंवा चौकाचौकात लाकुड, शेणाची गौरी यांची होळी पेटवून तिची पुजा केली जाते परंतु हे करण्यापाठिमागे काय उद्देश आहे हे समजून घेतले जात नसुन होळी ही वाईट विचारांची अहंकाराची तसेच अवगुणांची करावी.
दृष्ट प्रवृत्ती, अमंगल विचारांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, होळीच्या अग्नीमध्ये आपल्यातल्या नकारात्मकता, अहंकार, असत्याचे दहन करून सकारात्मकतेकडे आपल्या विचारांना आणि जीवनाला नवी दिशा मिळावी हा होळी हा सणामागील उद्देश आहे

परंतु आज मोठ्या प्रमाणातवर वृक्षतोड होत आहे तसेच वातावरणातील हवाही दुषित होऊ लागली त्याचा परिणाम निसर्गाच्या कालचक्रावर होत आहे त्यामुळे सण उत्सव साजरे करताना निसर्गाचा समतोल राखला पाहिजे या उद्देशाने शिऊर गावातील चव्हाण कुटुंबांनी होळीच्या शुभमुहूर्तावर आपल्या शेतात डाळिंबाची झाडे लावून होळी साजरी केली डाळींबाच्या झाडापासून फळ खायलाही मिळतील आणि कुटुंबाला उत्पादनातुन अर्थिक फायदा होणार आसल्याचे त्यांनी सांगितले.
सण ,उत्सव परंपरा ह्या समजून उमजून साजऱ्या केल्या पाहिजेत. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे प्रत्येक सण हा शेतीशी निगडीत आहे. आणि तो निसर्गाला पूरक होता आणि असला पाहिजे. आज निसर्ग संवर्धनाची गरज आणि होळी सणानिमित्त झाडे लावणे हा विचार निसर्गाला पूरकच आहे. त्यामुळे चव्हाण कुंटुंबाचा उपक्रम दिशादर्शक आहे.



