जामखेड प्रतिनिधी
गेली महिन्याभरापासून सुर्यनारायण नुसती आग ओकत आहे मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा बसत आहे या उन्हाळ्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे त्यातच आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत उन्हाच्या तिव्रतेने सर्दी खोकला तापाने बरोबरच इतरही आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत शहरातील सर्वच रूग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आसुन उमेदवारांच्या वतीने प्रचारासाठी तालुक्यात प्रचार सभा घोंगडी बैठका भेटेगाठी सुरू आसल्यातरी उन्हामुळे याकडे नागरिक पाठ फिरवतानाचे चित्र दिसत आहे.
आज सकाळी पासुनच वातावरणात बदल जाणवत होता दुपारनंतर अवकाशात ढग जमु लागले व उन्हाची तीव्रता कमी वाटु लागली व सायंकाळी सहा वाजल्या पासून विजांच्या कडकडाटासह रिमझिम सरी बरसु लागल्या व काही वेळ जोरदार सरी बरसल्याने वातावरणात काहीप्रमाणात का होईना ना गारवा वाटु लागला व उकाड्यापासुन नागरिकांना दिलासा मिळाला आसला तरी विजेच्या लपनडावाने यावर पाणी फिरले आहे गेली काही दिवसांपासून विजेची समस्या भेडसावत आहे विज नेहमी ट्रीप होणे आली ती पुरेशा दाबाने येत नाही त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.


