मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचा तडाखा! नागरिकांना सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा..

- Advertisement -spot_img

पाणी साठे झपाटय़ाने  लागले आटु!
उन्हाळी चारा पिकांना बसणार फटका..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात फेब्रुवारीत उन्हाची तीव्रता जाणवु लागली होती वातावरणातील बदलामुळे व ढगाळ हवामानामुळे तसं या मोसमात हिवाळा फार काळ जाणवला नाही
त्यामुळेच फेब्रुवारी महिन्यात ऊन वाढले व मार्चच्या सुरवातीलाच कडक उन्हाळा जाणवु लागला आहे


      २०२४ मध्ये तालुक्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे सर्व तलाव ओव्हर फ्लो झाले
त्यामुळे या वर्षी पाणी बाणीचे संकट भासणार नाही अशी बळीराजाला आपेक्षा होती आणि त्यामुळे रब्बी हंगामातील पिकं काढणीनंतर चारा पिकांना मोठ्या प्रमाणात बळीराजाने प्राधान्य दिले पण फेब्रुवारीतच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचे स्त्रोत झपाटय़ाने आटु लागले आहेत त्यामुळे चारा पिके धोक्यात आली आसल्याचे बळीराजाने सांगितले
तसेच जामखेड शहरात फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उकाडा आणि उन्हाचा तडाखा सुरू झाला. कमाल तापमानाने सरासरी ओलांडली. आता मार्च महिन्यातही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे शितपेयांची दुकाने गरिबांचा फ्रीज आसणारा माठ यांची दुकाने थाटली आहेत तर जामखेड शहरात उसाचा रस फार प्रसिद्ध आहे आणि तालुक्यातील शहरातील आलेला नागरिक रस प्यायल्या शिवाय जात नाही आसे रसवंतीगृह शहरात सुरू झाले आहेत त्यामुळे
कसा जाईल राव या वर्षीचा उन्हाळा!  अशी चर्चा नागरिक करत आहेत

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा