आ.रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविण्यास इच्छुक.

जामखेड प्रतिनिधी
युवा नेते गणेश माने गेली तेरा वर्षांन पासुन राजकारणात सक्रिय आहेत. आता जामखेड नगरपरिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे गणेश (रवि) चंद्रकांत माने हे गणेश (रवी) माने हे गेल्या 13 वर्षापासून राजकारणात सहभागी आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष, जामखेड ग्रामपंचायत सदस्य म्हणून, तसेच मड ई चां राजा जय हिंद तरुण मडळ बाजार तळ मंडळांमध्ये सामाजिक कार्यामध्ये सहभागी असतात.

तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा अध्दक्ष 2012 ते 2016 पर्यंत राजकीय कामाची जाणीव असणारे गणेश (रवि) चंद्रकांत माने हे जामखेड नगरपरिषद मधुन 3 व 4 प्रभागांमधून जनरल पुरुष कींवा ओबीसी पुरुष आरक्षण पडले तर या निवडणूकीच्या रींगणानात उतरणार आहेत.गणेश (रवी) माने हे ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना त्यांच्या काळात प्रथम नवीन ग्रामपंचायत इमारत झाली आहे.

बाजारतळातील ओटे, भुतवडा तलावातून पाण्याची पाईपलाईन सह अनेक जनहिताची कामे केली आहेत. गणेश माने हे स्वर्गीय माजी उपसरपंच बाळासाहेब राळेभात यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. येणारी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यास इच्छुक आहेत.

प्रदीर्घ काळापासून जामखेड नगरपरिषदेची निवडणूक झालेली नाही त्यामुळे शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही आणि येणारी निवडणूक ही सर्वच राजकीय पक्ष विकासाच्या मुद्यावरच लढवणार आहेत. जामखेड नगरपरिषदची रणधुमाळी सुरू झाली आसुन आता प्रथमच जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे तसेच प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक आपले नशिब आजमावणार असल्याने या निवडणूकीची चुरस वाढणार आहे.



