सभापती प्रा.राम शिंदेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा..

- Advertisement -spot_img

सचिन(नाना) घुमरे मित्र परिवाराने गुरेवाडी,महारूळीतील विद्यार्थींना केले रायटिंग पॅडचे वाटप.

जामखेड प्रतिनिधी
एक जानेवारी रोजी विधानपरिषद सभापती राम शिंदे साहेब यांचा वाढदिवस जामखेड तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला तसेच दर वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन (नाना) घुमरे यांच्या वतीने प्रत्येक वर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करून व समाजातील गरजू लोकांना मदत करून सभापती साहेबांचा वाढदिवस साजरा केला जातो.

यावर्षी गुऱ्हेवाडी महारुळी येथील सर्व शालेय विद्यार्थ्यांना सरपंच बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते रायटिंग पॅड चे वाटप करून साजरा करण्यात आला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन (नाना) घुमरे मित्र परिवाराच्या वतीने दिघोळ गणातील इतर गावात देखील शालेय विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड, स्कूल बॅग चे वाटप करून व समाजातील गरजू लोकांना  मदत करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी गावातील उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब लोंढे, नाना जाधव, दादा जाधव, नवनाथ जाधव, कल्याण जाधव, अर्जुन कोरडे, गौतम नाना कोरडे, महाराज धोंडीबा पवार, विकास कोरडे, अशोक जाधव, अंकुश मुळे, शामराव सातपुते, शरद चव्हाण, आप्पा कोरडे, उद्धव लोंढे, केरु जाधव, संतोष कोरडे, अशोक अनपट , शिवनाथ अनपट, विशाल कोरडे, शाळेचे शिक्षक राऊत सर व माने सर, व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक शेतकरी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा