आभ्यासातील सातत्य जिद्द चिकाटीने मेहनत घेतली तर यश मिळतेच:अजय (दादा) काशिद.

- Advertisement -spot_img

यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

जामखेड प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी आभ्यासत सातत्य ठेवुन जिद्दीने मेहनत घेतली तर जिवनातील ध्येय गाठता येते आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात फार मोठी स्पर्धा आहे ही जिंकण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी ते घेतले आहेत ते आज महत्वाच्या अशा आरोग्य क्षेत्रीत एम.बी.बी.एस डॉक्टर होण्यासाठीच्या पहिल्या फेरीत पात्र ठरले आसल्याचे अजय काशीद यांनी बोलताना सांगितले

नारायण भानुदास तांबे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स,सायन्स अँड इंजीनियरिंग काॅलेज जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील एमबीबीएस ला पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेली यशवंत विद्यार्थी

मिसाळ वनश्री बाळू गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव,गीते सुदर्शन उद्धव गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज धाराशिव निंभोरे श्रेयस तुकाराम व्यंकटेश्वर मेडिकल कॉलेज गजरोला,आमरोहा उत्तर प्रदेश,यादव स्नेहल अशोक नायर मेडिकल कॉलेज मुंबई, तसेच एमबीबीएस ला शिकत असलेली विद्यार्थी सासवडकर स्वरूप विनोद.
चुवास स्टेट मेडिकल विद्यापीठ चोबोकसरी रशिया,तांबे ओमकार प्रकाश
कृष्णा विश्व विद्यापीठ कराड एमबीबीएस पूर्ण झालेले विद्यार्थी भराटे आकाश धनंजय श्री देवराजा मेडिकल कॉलेज कोलार कर्नाटक बारस्कर उत्कर्ष मोहन.
डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक

वरील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सारोळा गावचे सरपंच व भाजपचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष अजय (दादा) काशीद तसेच कॉलेजचे प्राचार्य घुमरे सर, संस्थापक अध्यक्ष प्रकाश तांबे सर यांच्या हस्ते संपन्न झाला

यावेळी ओंकार इंग्लिश स्कूल प्राचार्य शिंगण मॅडम, पालक बाळू मिसाळ, उद्धव गीते, तुकाराम निंभोरे, भराटे सर, बारस्कर मेजर, सासवडकर सर, पिंगळे सर, म्हेत्रे मॅडम,  गांगर्डे सर,पवार मॅडम, नारायणकर मॅडम, राळेभात मॅडम शिंदे सर, मुळे सर, काशीद सर शिंदे मेजर, शंकर घुमरे ,गोकुळ डोके, यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला.
पालकांनी व  प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा