योगसंगम मध्ये नागेश विद्यालयात 3150 विद्यार्थ्यांनी सामूहिक योगासन करून योग दिन साजरा केला.

- Advertisement -spot_img

जागतिक योग दिन श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये उत्साहात साजरा.

जामखेड प्रतिनिधी

21 जून 2025 हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.
भारत सरकार आयुष्य मंत्रालय अंतर्गत योग संगम राष्ट्रीय उपक्रमांमध्ये श्री नागेश विद्यालयात  ३१५० विद्यार्थी,शिक्षक, एनसीसी कॅडेट ,पालक,ग्रामस्थ सहभागी होऊन योगासन व व्यायाम  प्रात्यक्षिक केली झाले.

योग संगम उपक्रमांतर्गत संपूर्ण भारत देशात एक लाख पेक्षा जास्त ठिकाणी सामूहिक योग केला गेला आहे त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय,ज्यूनिअर कॉलेज ,कन्या विद्यालय व १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नागेश युनिटचे कॅडेट मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
        योगशिक्षक प्रतिमा बोरा मॅडम व योगेश जसाभाटी  यांनी विविध योगासने सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक  सादर करून हसत खेळत व्यायामाचे सादरीकरण केले. विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहात हसत खेळत योग प्रात्यक्षिक केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके  बी के ,मुख्याध्यापिका भोर एस एस ,  उपमुख्याध्यापक नाळे एस के  ,पर्यवेक्षक जाधवर एस व्ही , पर्यवेक्षक संजय हजारे,गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे,साळुंके बी एस ,एनसीसी ऑफिसर मयूर भोसले , क्रीडा शिक्षक सुग्रीव ठाकरे,प्रा कैलास वायकर,प्रा मांडे एस आर, शंभूलाल बडे आदी मान्यवर उपस्थित होते.


मुख्याध्यापिका श्रीम भोर एस एस मनोगतात जागतिक योग दिनाचे महत्त्व सांगून मुला-मुलींनी तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामत सातत्य ठेवावे असे मार्गदर्शन केले.

प्राचार्य मडके बी के यांनी
व्यायामाचे जीवनात महत्त्व आहे तसेच चांगला आहार  सगळ्यांनी घेतला पाहिज
सर्वांनी दररोज व्यायाम करावा असा संकल्प करावा. वर्षभर व्यायामाची सवय ठेवावी.
          कार्यक्रमाचे नियोजन ही एनसीसी विभाग मार्फत करण्यात आले.
या भव्य उपक्रमाचे आमदार रोहित (दादा) पवार ,सतरा महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मिराज
यांनी विशेष अभिनंदन केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा