तरुणांचा आयडाॅल व सर्व समावेशक व्यक्तीमत्व म्हणून काकासाहेब आहेत परिचित.

जामखेड प्रतिनिधी
दिघोळ पंचायत समिती गणासाठी युवा पर्वाचा युवा शिलेदार काकासाहेब गर्जे आपल्या सामाजिक कामाच्या व जनसंपर्काच्या जोरावर तसेच गणातील नातेवाईक या बळावर प्रबळ दावेदार समजले जात आहेत.

दिघोळ पंचायत समिती गणात जायभायवाडी, बांधखडक, तेलंगशी, धामणगाव, दिघोळ, मोहरी, जातेगाव, बाळगव्हान, गुरेवाडी, वाघा, आपटी, वाकी, पिंपळगाव उंडा ही गावे आहेत. प्रत्येक गावातील तरुण वर्गाशी मोठ्या प्रमाणात संपर्क असणारा नेता म्हणून काकासाहेब गर्जे ओळखले जातात.

काकासाहेब गर्जे हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच सभापती प्रा राम शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. तसेच प्रत्येक गावात त्यांचा मोठा संपर्क आहे. प्रत्येकाच्या सुख दु:खात
ते हजर असतात. दिघोळ गणात मोठ्या प्रमाणावर नातेवाईक व मित्रमंडळी आहे. आणि सर्वाचा आग्रह आहे की काकासाहेब यांनी पंचायत समिती निवडणूक लढवावी.

एक नवीन चेहरा म्हणून काकासाहेब गर्जे यांना गणातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. तसेच त्यांनी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कामकाज पाहिलेले आहे. त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.


