पै.चिराग आजबे समाजाची सेवा करण्यासाठी निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत : नायगाव ग्रामस्थ.

जामखेड प्रतिनिधी
नायगावचे ग्रामदैवत श्रीनाथ महाराजांचे दर्शन घेऊन मंगेशदादा आजबे व पै चिराग आजबे यांची ग्रामस्थासह घोंगडी बैठक संपन्न झाली
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला तसा आणखी कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी इच्छुक उमेदवारांकडून गट व गणाचा जनसंपर्क दौरा सुरू झालेला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली साकत गटातुन
शेतकरी नेते मंगेशदादा आजबे यांचे चिरंजीव पै. चिराग आजबे हे निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहेत याच पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून त्यांचा साकत गटातील गावांमध्ये झंजावाती दौरा सुरू आहे आज सकाळी नायगाव येथे गाव भेटीवेळी ग्रामस्थांकडून या पिता पुत्रांचा सन्मान करण्यात
आला

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रामस्थ की शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणाऱ्या सेवकाला आपण साथ दिली पाहिजे जेणे करुन प्रशासनातील आपल्या समस्या सुटतील त्यामुळे पै. चिराग आजबे यांच्या उमेदवारीस नायगाव ग्रामस्थांकडून पसंती दर्शविली आहे

तसेच शेतकरी नेते मंगेश दादा आजबे यांनी कोरोना काळात अनेक जणांना मदत केली आहे याचाही संदर्भ घोंगडी बैठकीदरम्यान काही ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केला यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते



