भाजप भटक्या विमुक्त जाती-जमाती शहर उपाध्यक्ष किरण गायकवाड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन..
सभापती प्रा.राम शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक हरपल्याने सर्वत्र हळहळ; आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार..
जामखेड प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे भटक्या विमुक्त जाती-जमाती आघाडीचे शहर उपाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक किरण आजिनाथ गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे जामखेड शहरासह सामाजिक, राजकीय व भटक्या-विमुक्त समाजामध्ये शोककळा पसरली आहे.

किरण गायकवाड हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भटक्या विमुक्त जाती-जमाती समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत होते. समाजातील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.

भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे समाजामध्ये त्यांना विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते.

त्यांच्या अचानक निधनामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय सहकारी आणि समाजबांधवांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने भटक्या-विमुक्त समाजाचा एक कर्तव्यदक्ष, समाजाभिमुख आणि तळागाळातील कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

किरण आजिनाथ गायकवाड यांचा अंत्यविधी आज (दि.7 जुलै ) सायंकाळी ठीक ५ वाजता जामखेड येथील तपनेश्वर स्मशानभूमी येथे होणार असल्याची माहिती कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🕯️
“ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व गायकवाड परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो.”



