लक्ष्मीताई पवार राष्ट्रीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -spot_img

लक्ष्मीताई पवार राष्ट्रीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित..

जामखेड प्रतिनिधी
सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रात गेली अनेक वर्षे उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जामखेड येथील ‘जनविकास सेवाभावी संस्थे’च्या संस्थापिका लक्ष्मीताई किशोर पवार यांना मुंबई येथे आयोजित एका सोहळ्यात ‘राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित या राष्ट्रीय कार्यक्रमात लक्ष्मीताई पवार यांच्या समाजहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


मागील पंधरा दिवसांपूर्वी शिर्डी येथे ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. अवघ्या १५ दिवसांत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाल्याने जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा