शासन रोजगाराच्या संधी युवकांच्या दारापर्यंत घेऊन आले आहे:अमित(भाऊ) चिंतामणी.

- Advertisement -spot_img

शासन रोजगाराच्या संधी युवकांच्या दारापर्यंत घेऊन आले आहे:अमित(भाऊ) चिंतामणी.

रोजगार मेळाव्यात ७६ विद्यार्थ्यांची निवड; जामखेड महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी

जामखेड प्रतिनिधी
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित जामखेड महाविद्यालयात आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने आयोजित या मेळाव्यात सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी तब्बल ७६ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याने महाविद्यालयाच्या प्लेसमेंट व्यवस्थेचा ठसा उमटला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले, “शासन रोजगाराच्या संधी युवकांच्या दारापर्यंत घेऊन आले आहे. युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत स्वतःच्या प्रगतीसह समाजाच्या विकासातही सक्रिय योगदान द्यावे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर येथील प्र. सहाय्यक आयुक्त योगेश उगले उपस्थित होते. तसेच अमोल घोलप, प्राचार्य डॉ. जी. डी. केळकर, प्रा. एस. एन. गाडेकर, डॉ. एस. एम. गोलेकर, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात विद्यार्थ्यांना रोजगार, करिअर आणि उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपलब्ध नोकरीच्या संधी, आवश्यक पात्रता आणि निवड प्रक्रियेची माहिती दिली..

विद्यार्थ्यांनीही तज्ज्ञांशी संवाद साधत शंकांचे निरसन करून घेतले.
महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यंदा ७६ विद्यार्थ्यांची झालेली निवड ही महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रभावी प्लेसमेंट व्यवस्थेची साक्ष देणारी ठरली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन. बी. तरटे व प्रा. एस. डी. मोहळकर यांनी केले, तर प्रा. एस. एन. गाडेकर यांनी आभार मानले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा