राजुरीच्या विकासाचा शिल्पकार; कर्तव्यदक्ष सरपंच सागर (भाऊ) कोल्हे यांचा वाढदिवस उत्साहात..

- Advertisement -spot_img

राजुरीच्या विकासाचा शिल्पकार; कर्तव्यदक्ष सरपंच सागर (भाऊ) कोल्हे यांचा वाढदिवस उत्साहात..

सामान्य कुटुंबातून यशस्वी उद्योगपती ते आदर्श सरपंच; समाजसेवेचा घेतला वसा.

जामखेड प्रतिनिधी

राजुरी गावाच्या विकासाला नवी दिशा देणारे आणि जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणारे राजुरीचे कर्तव्यदक्ष सरपंच मा. सागर (भाऊ) कोल्हे यांचा वाढदिवस आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे.

आपल्या दूरदृष्टी, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि लोकाभिमुख निर्णयांमुळे त्यांनी राजुरीच्या विकासात मोलाचे योगदान दिले असून, गावकऱ्यांच्या मनात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सामान्य कुटुंबातून आलेल्या सागर भाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अथक परिश्रम, जिद्द आणि व्यावसायिक कौशल्याच्या बळावर उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी समाजकार्याचा मार्ग स्वीकारला. जनसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची त्यांची कार्यशैली आजही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरते.

रस्ते, गटारे व जलसंधारणाच्या कामांनी बदलला राजुरीचा चेहरामोहरा
सागर भाऊ कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राजुरी गावात अनेक विकासकामांना गती मिळाली. गावातील रस्त्यांची उभारणी, बंदिस्त गटारांची निर्मिती, स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना तसेच जलसंधारणाच्या विविध प्रकल्पांमुळे गावाचा कायापालट झाला आहे. विशेष म्हणजे, विकासकामांचा गाजावाजा न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणे ही त्यांची कार्यपद्धती ठरली आहे.

गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विविध योजना आणि उपक्रम राबविले. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी सकारात्मक काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष म्हणून ते तरुणांच्या हाताला काम आणि मनाला विचारांची दिशा देण्याचे कार्य प्रभावीपणे करत आहेत.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून त्यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची आणि समाजसेवेतील योगदानाची पावती मानला जातो.
आज वाढदिवसानिमित्त राजुरीसह परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भविष्यात जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी जनसेवेची व्याप्ती अधिक व्यापक करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
जनसामान्यांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्तव्यदक्ष नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य, निरोगी आरोग्य आणि यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा