बीएसएनएल अहिल्यानगर जिल्हा सल्लागार समितीवर पोपटराव गायकवाड यांची निवड.

- Advertisement -spot_img

बीएसएनएल अहिल्यानगर जिल्हा सल्लागार समितीवर पोपटराव गायकवाड यांची निवड.

खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीला यश; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

जामखेड प्रतिनिधी
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अहिल्यानगर जिल्हा सल्लागार समितीवर जातेगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व माजी सरपंच पोपटराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार बीएसएनएलच्या चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक उर्वशी संगवान यांनी ही नियुक्ती केली आहे.

पोपटराव गायकवाड यांनी पत्रकारिता, ग्रामविकास आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी दैनिक लोकमत, दैनिक पुण्यनगरी यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. तसेच जातेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

याशिवाय अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव तसेच जामखेड तालुका सरपंच संघाचे सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.

त्यांच्या दीर्घ अनुभवाचा लाभ बीएसएनएलच्या सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी व्हावा, या उद्देशाने खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडे त्यांची शिफारस केली होती. या शिफारशीची दखल घेत केंद्र सरकारने त्यांची बीएसएनएलच्या जिल्हा सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे.
नुकताच बीएसएनएल अहिल्यानगर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पोपटराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बीएसएनएलच्या सेवा अधिक जलद, अखंडित आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, आमदार रोहित पवार, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे तसेच पत्रकार नासीर पठाण, संतराम सुळ, वसंत सानप, सुदाम वराट, अशोक निमोणकर, मैनोद्दीन तांबोळी, मिठुलाल नवलाखा, अशोक वीर, दीपक देवमाने, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, ओंकार दळवी, समीर शेख,धनराज पवार, संजय वारभोग, निलेश वनारसे, विजय अवसरे, नंदूसिंग परदेशी, फारुख शेख, संतोष थोरात, दत्तराज पवार, बाळासाहेब वराट, प्रकाश खांडागळे,अनिकेत चव्हाण आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा